महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३१ जानेवारी । मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूरसह दहा प्रमुख पालिकांवर प्रशासक नियुक्त करण्यात येण्याची शक्यता आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मुंबईबरोबरच या प्रमुख दहा पालिकांवर प्रशासक नियुक्त केला जाण्याची शक्यता आहे.