शिवसेनेचा उत्पल पर्रीकरांना थेट पाठिंबा, पर्रीकरांविरोधातील उमेदवारी घेतली मागे; भाजपचे टेंशन वाढले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३१ जानेवारी । गोव्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकरांना भाजपने तिकीट नाकारले. यानंतर ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत. पणजीतून उत्पर पर्रिकर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे राहिले तर त्यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार नाही असे शिवसेनेने म्हटले होते. आता त्यांनी म्हटल्याप्रमाणेच शिवसेनेने आपला उमेदवार मागे घेतला आहे. दिलेल शब्द पाळला असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी याविषयी माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्पल पर्रिकरांना भाजपकचे तिकीट देण्यावरुन आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे दिसत आहे. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत भाजपवर सतत निशाणा साधत होते. गोव्यात भाजपला ज्यांनी मोठे केले त्यांच्या मुलालाच भाजप तिकीट नाकारत असल्याचे म्हणत ते भाजपवर टीका करत होते. दरम्यान उत्पल पर्रीकर अपक्ष लढल्यास आम्ही सर्वजण त्यांना पाठिंबा देऊ असे संजय राऊतांनी जाहीर करून टाकले होते. आता बोलल्या प्रमाणाचे पणजी मतदारसंघातील उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.

संजय राऊतांनी ट्विट करत म्हटले की,’दिलेला शब्द आम्ही पाळत आहोत. शिवसेनेचे शैलेंद्र वेलिंगकरांनी पणजीमधून उमेदवारी मागे घेतली आहे. एवढेच नाही तर आमचे कार्यकर्ते उत्पल पर्रीकरांना पूर्ण पाठिंबा देणार आहेत. पणजीची लढाई ही केवळ निवडणुकीपुरती आहे. मात्र हे गोव्याच्या राजकारणाचे शुद्धीकरण देखील असल्याचे आमचे मत आहे.’

दरम्यान आता शिवसेनेने देखील उत्पल पर्रिकरांना पाठिंबा दिल्याने भाजपचे टेंशन वाढणार आहे. दिवंगत नेते मनोहर पर्रीकरांवर प्रेम करणारा मोठ्या प्रमाणात वर्ग पणजीमध्ये आहे. आधीच भाजपने पर्रिकरांना तिकीट नाकारले आहे. आता ते अपक्ष निवडणूक लढवत आहे. यासोबतच शिवसेनेने देखील आपला उमेदवार मागे घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे उत्पल पर्रीकरांना आणखी बळ मिळणार आहे आणि भाजपचे टेंशन वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *