महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३१ जानेवारी । सध्या देशात नागिरिकांचा कल इलेक्ट्रिक वाहने (EV) खरेदी करण्याकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. Tata Motors च्या इलेक्ट्रिक SUV Nexon EV ने विक्रीत एक नवीन टप्पा गाठला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार लॉन्च झाल्यापासून 2 वर्षात या इलेक्ट्रिक वाहनाने 13,500 युनिट्सपेक्षा जास्त विक्रीचा आकडा पार केला आहे. एप्रिल 2021 मध्येच कंपनीने सांगितले होते की, कारचे चार हजार युनिट्स विकले गेले आहेत. अशा प्रकारे, एकूण 10 महिन्यांत, Nexon EV ने 9000 हून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत.
सध्या, Tata Nexon EV ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. त्याची दर महिन्याला सुमारे एक हजार युनिट्सची विक्री होते. टाटा मोटर्सची ही पहिली इलेक्ट्रिक कार होती, जी खाजगी खरेदीदारांसाठी बाजाराच आणली गेली होती. दरम्यान Tata Nexon EV ची किंमत 14.29 लाख ते 16.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.
310KM पेक्षा जास्तची रेंज
Tata Nexon EV मध्ये , कंपनीने 30.2 kWh क्षमतेचा लिथियम-आयन लिक्विड कूल्ड बॅटरी पॅक दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जमध्ये 315 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही फास्ट चार्जिंग सीस्टीमसह केवळ 1 तासात 80% पर्यंत चार्ज होते. तर नियमित चार्जरने या कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 8 ते 9 तास लागतात.
या कारची इलेक्ट्रिक मोटर 127 bhp आणि 245 Nm पीक टॉर्कसाठी ट्यून केली गेली आहे. याचा सर्वाधिक वेग 120 किमी प्रतितास असून तो 9.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. या कारचा बॅटरी पॅक IP67 रेटेड वॉटर रेझिस्टंट आहे. कंपनी त्यांच्या बॅटरीवर 8 वर्षे / 1.6 लाख किमी. पर्यंत वॉरंटी देखील ऑफर करते. Nexon EV तीन कलर ऑप्शन्समध्ये उपवब्ध आहे सिग्नेचर टील ब्लू, ग्लेशियर व्हाइट आणि मूनलाईट सिल्व्हर. अलीकडेच, कंपनीने एक डार्क एडिशन देखील सादर केले आहे.