महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ फेब्रुवारी । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकाचे प्लॅटफॉर्म (Platform ticket) तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने मंगळवारपासून (१ फेब्रुवारी) पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपये करण्यात आले आहे.
कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्यभरात निर्बंध देखील लागू केले होते. स्थानकावरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाच्या रकमेत वाढ केली होती. यासह केवळ वृद्ध, दिव्यांग, रुग्ण, गरोदर आदींसह मदतीची गरज असणाऱ्या व्यक्तींनाच प्लॅटफॉर्म तिकिटे देण्यात येत होते.
Maharashtra: Normal sale of platform tickets resumes at Pune railway station. With effect from Feb 1, the platform tickets will be available at Rs 10 per person. The cost was earlier raised to Rs 50 to deter unnecessary crowding at the railway station amid the #COVID19 pandemic.
— ANI (@ANI) February 1, 2022
सध्याच्या कोविड स्थितीचा आढावा घेऊन पुणे (Pune) रेल्वे विभागाने पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म तिकिटाच्या (Platform ticket) दरात बदल केला आहे. १ फेब्रुवारीपासून पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटासाठी ५० ऐवजी १० रुपये आकारण्यात येत आहे.