पिंपरी- चिंचवड महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । लक्ष्मण रोकडे । दि १ फेब्रुवारी । पिंपरी- चिंचवड महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना आज सकाळी मंगळवारी (दि.1) जाहीर करण्यात आली. तळवडे येथून प्रभागाला सुरुवात होणार असून शेवटचा प्रभाग सांगवी असेल. 139 नगरसेवक संख्येसाठी तीन सदस्यांचे 45 तर चार सदस्यांचा एक प्रभाग सांगवीचा आहे. प्रभागाची किमान लोकसंख्या 32 हजार तर कमाल लोकसंख्या 40 हजार आहे. अनुसूचित जातीसाठी 22 तर अनुसूचित जमातीसाठी 3 जागा राखीव आहेत. 114 जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत.

महापालिकेच्या नगरसेवक संख्येत 11 ने वाढली आहे. पूर्वी 128 होती ती आता 139 झाली आहे. या प्रभाग रचनेकडे नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार आणि नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. नवा प्रभाग कसा असेल, त्याला कोणता भाग जोडला असले, कोणता भाग वगळला असेल याबाबत कमालीची उत्कंठा आहे. महापालिकेची सन २०१७ मधील निवडणूक चार नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीने झाली. सध्या शहरात ३२ प्रभाग आहेत.

आता तीनसदस्यीय पद्धतीनुसार ४६ प्रभाग होतील. त्यातील ४५ प्रभाग तीन नगरेसवकांचे तर एक प्रभाग चार नगरसेवकांचा असेल. प्रभागाचा कच्चा आराखडा तयार करताना प्रगणक गट, प्रभाग दर्शविणाऱ्या खुणा निश्चित केल्या जाणार आहेत. हा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर त्यामध्ये ५० वेळा सुधारणा करण्यात आली.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जातींसाठी (एससी) 16टक्के आरक्षण आहे. त्यामुळे 139 सदस्यांच्या महापालिका सभागृहात 22 सदस्य असतील. त्यात महिला व पुरुष सदस्यांची संख्या 11असेल. दरम्यान, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही गांधीनगर, खराळवाडी, मोरवाडी, ज्ञानेश्वर नगर, एम्पायर इस्टेट, अजमेरा काॅलनी, विशाल थिएटर या प्रभाग रचनेत आली असून त्यांची एकून लोकसंख्या 38244 आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *