महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १ फेब्रुवारी । पुढील २५ वर्षांची ब्लू प्रिंट असा हा अर्थसंकल्प आहे. आणि महिला सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. केंद्र सरकारतर्फे महिलांसाठी तीन नवीन योजना सुरू करण्यात येणार आहेत. आमच्या सरकारने महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोशन २.० सारख्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या आहेत.
अर्थमंत्री म्हणाल्या की, महिला आणि बालकांच्या एकात्मिक विकासासाठी तीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी दोन लाख अंगणवाड्या आणखी उत्तम केल्या जाणार आहेत. तसेच मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी राष्ट्रीय टेलि मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला जाईल.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टमसाठी खुले व्यासपीठ सुरू केले जाईल. याद्वारे डिजिटल रजिस्ट्री, युनिक हेल्थ आयडेंटिटी आणि आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी युनिव्हर्सल अॅक्सेस दिला जाईल.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ECLGS) मार्च २०२३ पर्यंत वाढवली जाईल. हमी कवच (गॅरंटी कवर) ५०,००० कोटी रुपयांवरून एकूण ५ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविला जाईल.
अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, यंदाचा अर्थसंकल्प विकासाला गती देणारा राहील. सर्वसमावेशक वाढ, उत्पादकता वाढ, ऊर्जा संक्रमण आणि हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठीची पावले, हे विकासाचे चार स्तंभ आहेत. पीएम गति शक्ती मास्टर प्लॅन हा विकासाच्या सात इंजिनांवर आधारित असल्याचे सीतारामन म्हणाल्या.