महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ फेब्रुवारी । अर्थसंकल्प 2022-23 मध्ये अर्थव्यवस्था सुधारण्या साठी ठोस अशी पाऊले उचललेली दिसत नाहीत. आहे त्याच परिस्थीतीनुसार जिवन जगावे असा एकच संदेश अर्थसंकल्पाने दिला आहे. करदांत्या मध्ये नवीन उत्साह निर्माण होईल काहीच नाही.
आयकरात दिलासा नाही परंतू महागाईत वाढ होईल असेही नाही कारण आयकराच्या रचनेत कोणताही बदल झालेला नाही. परंतू आयकर रिटर्न दाखल झाल्यावर नजर चुकीने इतर उत्पन्नासहीत अजून काही हकीकत दाखल करायचे राहून गेली असेल तर त्यात सुधारणा करून सुधारीत आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी 2 वर्ष पर्यंत अशी भरगोस मुदत वाढून मिळाली आहे. स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्रीची नोंदणी कुठूनही करता येईल ज्याला “युनिफॉर्म रजिस्ट्रेशन सिस्टीम” असे म्हटले आहे. हया सिस्टीम चा फायदा होईल जनतेची धावपळ न होता सोयीच्या ठिकाणी नोंदणी करून घेता येईल….परंतू ह्याचा गैर उपयोग होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. पि.के.महाजन.