महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ फेब्रुवारी । BJP Corporator Arrested : 55 हजारांची खंडणी (Ransom) घेतल्याच्या आरोपाखाली भाजप नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह अन्य चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. घोळवे याच्यावर व्यापाऱ्यांना गाळे मिळवून देण्यासाठी खंडणी घेतल्याचा आरोप आहे. (BJP Corporator Keshav Gholve Arrested In Pimpri)
पिंपरीतील कापड मार्केटमधील दुकानदारांकडन खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. घोळवे हे माजी उपमहापौर आहे. त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आल्याची माहिती आज सकाळी समजली.पोलिसांनी खंडणी प्रकरणी भाजप नगरसेवक केशव घोळवे, गुड्डू यादव यांच्यासह अन्य तिघांना अटक केली आहे. खंडणीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.