महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ फेब्रुवारी । BCCI ने अधिकृत स्टेटमेंट जारी करुन भारतीय संघातील चार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील तिघांना असं एकूण सात जणांना कोरोना व्हायरसची (Corona positive) बाधा झाल्याची माहिती दिली आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध येत्या 6 फेब्रुवारीपासून रविवारपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी मयंक अग्रवालचा (mayank agarwal) 18 सदस्यीय संघात समावेश करण्यात आल्याची माहिती दिली आहे. भारत वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वनडे आणि कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर तीन टी-20 सामने होतील. टीन इंडियातील तीन क्रिकेटपटुंचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अखिल भारतीय निवड समितीने मयंक अग्रवालचा वनडे संघात समावेश केल्याची माहिती बीसीसीआयने स्टेटमेंटमधून दिली आहे.
यांना झाली कोरोनाची बाधा
आगामी वनडे मालिकेसाठी संघातील सर्व खेळाडूंना 31 जानेवारीला अहमदाबाद येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. घरुन निघण्याआधी RT-PCR टेस्ट करण्यास सांगितले होते. तो रिपोर्ट निगेटिव्ह असेल, तर प्रवास ग्राह्य धरला जाणार होता. बीसीसीआयने जारी केलेल्या पत्रकामध्ये शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड आणि स्टँडबायवर असलेल्या नवदीप सैनी या चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचं म्हटलं आहे. फिल्डिंग कोच टी. दिलीप, सुरक्षा लायसन अधिकारी बी लोकेश आणि स्पोटर्स मसाज थेरपीस्ट राजीव कुमार यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
पुढचे सात दिवस आयसोलेशनमध्ये
सलामीवीर शिखर धवन, वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यांची सोमवारी केलेली RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ऋतुराज गायकवाडची मंगळवारी करण्यात आलेली चाचणी पॉझिटिव्ह ठरली आहे. श्रेयस अय्यर आणि मसाज थेरपीस्ट राजीव कुमार यांची बुधवारी केलेली चाचणी पॉझिटिव्ह आली. कोरोनाची बाधा झालेले सर्वजण पुढचे सात दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहेत. त्यामुळे त्यांना वेस्ट इंडिज विरुद्धची पहिली वनडे खेळता येणार नाहीय.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेवर कोरोनाचे सावट आहे. नियमानुसार कोविड प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करण्यात येईल. वेस्ट इंडिजचा संघ कालच अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. नुकत्याच संपलेल्या टी-20 मालिकेत त्यांनी इंग्लंडवर विजय मिळवला होता.