महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ फेब्रुवारी । टोल नाकावरील रांगा आणि गर्दी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘फास्टॅग’ (Fasttag) प्रणाली सुरु केली होती. मात्र आता ‘फास्टॅग’ एेवजी ‘जीपीएस'(GPS) प्रणाली तंत्राचा वापर करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. संसदीय समितीने ‘फास्टॅग’ हटवण्याची शिफारस केली आहे. परिवहन आणि पर्यटन संसदेच्या समिती अध्यक्षांनी बुधवारी संसदेमध्ये एक रिपोर्ट सादर केला. यानुसार आता ‘जीपीएस’ प्रणाली लवकरच सुरु होणार आहे.
जीपीएस यंत्रणेच्या मदतीने टोलचे (Toll Plaza )पैसे बँक खात्यातून वजा करणारी यंत्रणा उभी राहणार आहे. ऑनलाईन रिचार्ज करताना काहीजणांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र जीपीएस यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर या समस्येतून कायमची वाहनधारकांची सुटका होण्यास मदत होणार आहे. याशिवाय टोल नाका उभा करण्याचा खर्चही कमी होणार आहे.
टोलनाक्यावरील ‘फास्टॅग’मुळे राष्ट्रीय महामार्गाला (National Highway) पर्याय शहरी व ग्रामीण भागातून जाणाऱ्या रस्त्यावरील अवजड वाहनांची वर्दळ घटली आहे. ‘फास्टॅग’ने त्या अवजड वाहनांना लगाम लागल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरी वस्तीला दिलासा मिळाला आहे. रस्त्यांचा दर्जाही चांगला राहण्यास हातभार लागला आहे.
या प्रस्तावातील प्रमुख मुद्दे
१) जीपीएस प्रणाली अंतर्गत पैसे थेट बँकेतून वजा केले जाणार
२) टोल नाक्यावरील रांगा कमी होतील
३) टोल नाका उभा करण्यासाठी येणारा खर्च कमी होईल