महाराष्ट्र २४ ;ऑनलाईन ; पिंपरी चिंचवड, : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमधील नागरिकांसाठी थोडी दिलासादायक बातमी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मागील 3 दिवसांत एकाही कोरोनाबाधित नवीन रुग्णाची नोंद झाली नाही.
त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेऊन घरातच थांबलं तर कोरोना पसरण्याची साखळी तोडण्यात त्यांना पूर्णतः यश येऊ शकते असा विश्वास व्यक्त केला जात असून नागरिकांना घरीच बसून राहण्याचं आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी केलं आहे.