महाराष्ट्र २४- ऑनलाईन ;मुंबई ;रोज सकाळी तीनच तास जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याची मुभा द्या, असे आदेश राज्य सरकारने जारी केले असून, सतत खरेदीसाठी बाहेर पडणार्यांविरुद्ध कठोर कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य पोलिसांना दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेली राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी कठोरपणे करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभरात संचारबंदीतही बाहेर पडणार्यांना सतर्क केले. बाहेर पडून कायदा हातात घेण्याचा कुणी प्रयत्न करू नये कारण नसताना घराबाहेर पडू नये. आणखी कठोर पावले उचलायला भाग पाडू नका, असा इशाराच उपमुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दिला. मंत्रालयात मुख्य व उपमुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीनंतर पार पडली.
त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबईसह राज्यभर किराणा आणि भाजीपाला खरेदीसाठी संचारबंदीतही प्रचंड गर्दी होत आहे. याची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले गर्दी पाहून दोन-तीन तासातच जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्याची मुभा देण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत. सकाळी 8 ते 11 या वेळेत घरातील एकानेच बाहेर पडून खरेदी केली तर गर्दी आटोक्यात आणता येईल. सर्वांच्या सहकार्याची नितांत गरज आहे असे आवाहनही त्यांनी केले.
काही लोक साठे करून पैसे कमावण्याचा धंदा करत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. मास्क किंवा औषधांची अवैध साठेबाजी करणार्या असामाजिक घटकांवर कठोर कारवाई केली जाईल. अशाप्रकारे कोण चुकीचे वागत असेल तर त्यांना वेळप्रसंगी जेलमध्ये टाकण्यात येईल, असा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी दिला. औषधे व फॅमिली डॉक्टरकडे जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे करू नका. सरकारी दवाखाने आहेत. खासगी दवाखान्यांनी प्रतिसाद दिला आहे. मेडिकल कॉलेज आहेत तिथे तपासणी करण्याची मुभा देण्यात आली आहे. शिवाय खाजगी दवाखान्यांना परवानगी देण्यात आली आहे. राज्यात दिवसभरात साधारण दोन हजार लोकांची तपासणी होवू शकते अशी व्यवस्था करण्यात आली आहे असेही पवार यांनी सांगितले.
राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी, संचारबंदीची कठोर अंमलबजावणी.
संचारबंदीत पोलिसांना संपूर्ण स्वातंत्र्य ,नागरिकांनी घरीच थांबून सहकार्य करावे. खरेदीसाठी बाजारात गर्दी करु नये.भाजीपाला, फळे, अन्नधान्य जीवनावश्यक पुरवठा सुरळीत ठेवणार.जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणं ही सरकारची जबाबदारी.कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवक सुरळीत ठेवणार
भाजीपाला, फळ उत्पादक शेतकर्यांचा माल बाजारात येणार, त्यांचं नुकसान होणार नाही, राज्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलिस चांगलं काम करत आहेत.आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी उपाययोजना सुरु, व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु.मास्क, सॅनिटायझर, औषधे, जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा, काळाबाजार करणार्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकणार.