इंग्लंडला धूळ चारत पाचव्यांदा रचला इतिहास ; युवा भारत विश्वविजेता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . 6 फेब्रुवारी । भारताचा युवा संघ पुन्हा एकदा अंडर 19 क्रिकेटमध्ये (ICC under 19 world cup) वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. अँटिंग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात यश धुलच्य़ा (Yash dhull) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अंडर 19 टीमने इंग्लंडचा चार विकेट आणि 14 चेंडू राखून पराभव केला. विकेटकिपर दिनेश बानाने षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 190 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताच्या युवा टीमने कुठलाही धोका न पत्करता संयमाने फलंदाजी करत हे लक्ष्य पार केलं. सामन्यात एकवेळ भारताची चार बाद 97 अशी स्थिती होती. त्यावेळी ऑलराऊंडर निशांत सिंधु (Nishant sindhu) आणि राज बावाने पाचव्या विकेटसाठी 67 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. निशांत सिंधू (50) धावांवर नाबाद राहिला, तर राज बावाने (35) धावा केल्या. आजच्या सामन्याचा नायक ठरला तो राज बावा पाच विकेट आणि 35 धावा अशी अष्टपैलू कामगिरी त्याने केली.

या चार कर्णधारांनी भारताला जिंकून दिला अंडर 19 वर्ल्डकप

भारताने आतापर्यंत आठ वेळा अंडर 19 वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली आहे. 2000 साली मोहम्मद कैफ त्यानंतर 2008 मध्ये विराट कोहली 2012 मध्ये उनमुक्त चांद, 2018 मध्ये पृथ्वी शॉ आणि 2022 मध्ये यश धुलच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले आहे. यापूर्वी 2020 मध्येही भारताने अंडर 19 वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली होती. पण अंतिम फेरीत बांगलादेशकडून पराभव झाला होता. आज भारताच्या युवा संघाने दमदार कामगिरी करुन पुन्हा एकदा जेतेपद पटकावले. अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारता इतका दुसरा कुठलाही यशस्वी संघ नाहीय.

भारताची प्लेइंग इलेवन – अंगकृष रघुवंशी, हरनूर सिंह, शेख रशीद, यश धुल, निशांत सिंधु, राज्यवर्धन हानगरगेकर, दिनेश बाना, कौशल तांबे, राज बावा, विक्की ओस्तवाल आणि रवि कुमार

इंग्लंडचा संघ– जॉर्ज थॉमस, जेकब बेथेल, टॉम प्रेस्ट, जेम्स रियू, विलियम लिक्सटन, जॉर्ज बेल, रेहान अहमद, एलेक्स होरटोन, जेम्स सेल्स, थॉमस एसपिनवॉल आणि जोशुआ बॉयडन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *