Lata Mangeshkar एका सुरेल युगाचा अंत : लता मंगेशकरांची टॉप 10 गाणी, स्वर्गीय सुरांची मैफल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ फेब्रुवारी । लता मंगेशकर यांचं जाणं म्हणजे भारततीय गायकीचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालंय. पण लतादिदींची गाणी मात्र कायम आपल्या मनात राहतील . अशीच काही अजरामर गाणी

# ‘मेरी आवाजही पहचान है मेरी…’ हे लतादिदींचं गाणं म्हणजे त्यांच्या जिवनाचं वर्णन करणारं आहे. लता दिदींची विशेष ओळखही त्यांचा आवाज आहे… आणि त्यांची ही जोवर सूर्य चंद्र आहे तोवर लता मंगेशकर यांची ही ओळख कायम राहिल.

# ‘ऐ मेरे वतन के लोगों’ लतादिदींचं हे गाणं म्हणजे राष्ट्रप्रेमाने ओतप्रेत भरलेली देशवासियांना घातलेली भावनिक साद… तुमच्या माझ्या मनातलं देशप्रेम त्यांच्या आवाजातून व्यक्त होतं, असंच हे गाणं ऐकताना जाणवतं.

# ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हे अतिशय सुंदर गाणं लता दिदींच्या आवाजात ऐकणं म्हणजे पर्वणीच.

# ‘लग जा गले…’ हे गाणं म्हणजे लता दिदींच्या गायकीचा सर्वोच्च बिंदू ठरला. त्यांचं हे गाणं 58 वर्षानंतरही तितकंच फ्रेश आहे.

# ‘सत्यम शिवम सुंदरम्’ हे गाणे लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत दिलं.

# ‘एक प्यार का नगमा है’ या गाण्याच्या साध्या बोलांमध्ये आयुष्याची खोली आहे आणि याचमुळे हे गाणं अजरामर झालंय. हे गाणे लतादीदींच्याही मनाच्या अगदी जवळ होतं.

# ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा’ हे ‘आंधी’ चित्रपटातील गाणं आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गाणं म्हणजे जीवनाकडे वेगळ्या पद्धतीने बघायला शिकवतं.

# ‘सोलह बरस की बली उमर को सलाम’ हे गाणे लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातील आहे. हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकच रहावंसं वाटत.

# ‘आयेगा आने वाला’ या गाण्यानंतर लतादीदींनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. यानंतर राज कपूरच्या ‘बरसात’ मधील ‘जिया बेकरार है, हवा मे उडता जाये’ सारखी गाणी गाऊन लतादीदींनी बॉलिवूडमध्ये एक यशस्वी पार्श्वगायिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

# ‘मेरे प्यार की उमर हो इतनी सनम’ हे गाणे ‘वारीस’ चित्रपटातील आहे, जे लता दीदींनी अतिशय सुंदर पद्धतीने गायलं आहे. हे गाणं लतादीदींपेक्षा चांगलं कदाचित कुणीच गाऊ शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *