सिंगल चार्जमध्ये 120 KM धावणारी AMO Electric Bikes ची दमदार इलेक्ट्रिक स्कूटर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ७ फेब्रुवारी । AMO Electric Bikes च्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Jaunty Plus ची प्रतीक्षा अखेर संपली. कंपनीने सोमवारी ही स्कूटर लाँच केली. कंपनीने एक निवेदन जारी करून सांगितले की, ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 120 किलोमीटरपर्यंत धावू शकेल. यासोबतच या स्कूटरची बॅटरीही चार तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. या इलेक्ट्रॉनिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.10 लाख रुपये आहे. तसेच, या इलेक्ट्रॉनिक स्कूटरमध्ये 60 V/40 Ah च्या लिथियम बॅटरी बसवण्यात आली आहे.

क्रूझ कंट्रोल स्विच, इलेक्ट्रॉनिक असिस्टेड ब्रेकिंग सिस्टीम (ई-एबीएस), अँटी थेफ्ट अलार्म आणि मजबूत चेसिससह Jaunty Plus स्कूटर बाजारात आणली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन, हाय ग्राउंड क्लीयरन्स, साइड स्टँड सेन्सर, सेंट्रल लॉकिंग, फ्रंट डिस्क ब्रेक, डीआरएल लाईट्स आणि इंजिन किल स्विच यांसारख्या फीचर्सचाही समावेश आहे.

AMO Electric Bikes चे संस्थापक आणि एमडी सुशांत कुमार यांनी नवीन इलेक्ट्रिक स्कूटरच्या लॉन्चिंगबाबत सांगितले की, या स्कूटरचे प्लॅनिंग आणि डिझाइनिंग कंपनीच्या आर अँड डी टीमने केले आहे. तसेच, या इको-फ्रेंडली बाइक्स दाखवतात की, त्यांचा ब्रँड सर्वोत्कृष्ट ईव्ही मोबिलिटी सोल्यूशन आणि सेवा प्रदान करण्यास पूर्णपणे सक्षम आहे, असेही सुशांत कुमार म्हणाले.

दरम्यान, सुशांत कुमार हे या स्कूटरच्या लॉन्चबद्दल खूप उत्सुक आहेत. तसेच, या इलेक्ट्रिक स्कूटर्स 15 फेब्रुवारीपासून 140 डीलरशिपवर उपलब्ध होतील असे कंपनीने म्हटले आहे. ही नवीन स्कूटर लॉन्च केल्याने भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक-वाहनांची वाढती क्रेझ दिसून येते. हे कंपन्यांना अधिक नाविन्यपूर्ण उत्पादने आणण्यासाठी प्रेरित करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *