भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे! ठाण्यातील बॅनर्समुळे राजकीय चर्चेला उधाण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ फेब्रुवारी । एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील मातब्बर नेत्यांपैकी एक आहेत. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु असताना शिवसेनेकडून एकनाथ शिंदे हेच नाव सगळ्यात हॉट फेव्हरिट मानले जात होते. परंतु, ऐनवेळी मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला आणि एकनाथ शिंदे या स्पर्धेतून बाहेर पडले. मात्र, ठाण्यातील बॅनर्समुळे पुन्हा एकदा नवी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. ९ फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून त्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर लावण्यात आले आहेत. ठाण्यातील वागळे इस्टेट भागात नगरविकास मंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स झळकले. या पोस्टरमध्ये शिंदेच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला आहे. वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. परंतु एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख अनेकांच्या नजरेत भरणार आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी अजूनही कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *