महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ फेब्रुवारी । एक मोठा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने शेतजमिनीचा सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरीकरणात वाढ झाली असून, अनेक शहरात शेतजमीनच शिल्लक नसल्यामुळे हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ज्या शहरांमध्ये सिटी सर्वे पूर्ण झाले आहेत. तसेच सातबारा उताराही सुरू आहे, त्या शहरात आता सातबारा बंद करुन प्रॉपर्टी कार्ड सुरू करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाकडून घेण्यात आला आहे.
भूमी अभिलेख विभागाने प्रॉपर्टी कार्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, मोठ्या शहरांमध्ये शेतजमीनी शिल्लक राहिलेल्या नाहीत. त्यामुळे या भागातील सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आहे. सध्या सिटी सर्व्हे झालेल्या शहरांत सातबारा सुरू असून, अशा शहरात सातबारा बंद करुन तिथे फक्त प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अनेक शहरात लोकसंख्या वाढ होत असल्यामुळे शहरीकरण वाढू लागले आहे. त्यामुळे शेतजमिनीची कमतरता भासत आहे. त्यामुळे सातबाऱ्याचे रुपांतर आता प्रॉपर्टी कार्डमध्ये करण्यात आला आहे. कर चुकवण्यासाठी आणि इतर लाभ मिळावेत, यासाठी सातबारा वापरला जातो. तसेच काही ठिकाणी तर फसवणुकीचे प्रकारही उघड झाले आहेत. त्यामुळे सातबारा बंद करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाकडून घेण्यात आलेला आहे. सुरुवातीला काही शहरांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यात नाशिक, सांगली, मिरज तसेच पुण्यातील हवेली तालुक्याचा समावेश आहे. त्यानंतर हा निर्णय संपूर्ण राज्यात देखील लागू करण्याची शक्यता आहे.