महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ फेब्रुवारी । इजिप्तमध्ये उत्खननात पुराणवस्तु संशोधकांना एक अमूल्य खजिना हाती लागला आहे. या खजिन्यामुळे प्राचीन काळातील अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
हे उत्खनन सध्याच्या सोहाग शहरानजीक अथरिबिस या प्राचीन ठिकाणी हे उत्खनन करण्यात आलं. अथरिबिस ही प्राचीन इजिप्तच्या एका प्रदेशाची राजधानी होती. हे शहर तत्कालीन राजधानी काहिरापासून 40 किलोमीटर दूर नाईल नदीच्या पूर्व किनाऱ्यावर आहे. या ठिकाणी उत्खनन करण्यात आलं. या खोदकामादरम्यान संशोधकांना एक टाईम कॅप्सुल मिळालं आहे. या टाईम कॅप्सुलवर 18 हजार पट्ट्या आहेत.
या पट्ट्या भांड्यांच्या खापरावर कोरलेल्या आहेत. प्राचीन इजिप्तमध्ये खापरांचा वापर नोटपॅड रुपात करण्यात यायचा. त्यानुसार या खापरांवर अनेक तपशील कोरलेले आहेत. ही लिपी डेमोटिक भाषेतील असून ती पटोलेमाईक आणि रोमन काळातील प्रशासकीय भाषा होती. हा काळ इसवी सन पूर्वी 600चा असावा.
या पट्ट्यांवर तत्कालीन मानवी जीवनातील अनेक तपशील आढळले आहेत. त्यात खासगी पत्र, कपड्यांची यादी, साहित्य लेखन असा दस्तऐवज आहे. काही तुकड्यांवर चित्र कोरली आहेत. काही तुकड्यांवर अनेक जिन्नसांची, रोजच्या वापरातील वस्तुंची यादी, महिन्याची यादी, क्रमांक, गणिताची समीकरणं, व्याकरणाच्या समस्या यांची नोंद करण्यात आली आहे.