” युध्द कोरोना शी ” जेष्ठ अर्थतज्ञ पी.के.महाजन

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24; पिंपरी चिंचवड- जेष्ठ अर्थतज्ञ पी.के.महाजन यांनी करोना विषयी महाराष्ट्र 24 च्या माध्यमांतून केलेले आवाहन…

तलवारी-बंदुका आणी अस्त्र शस्त्र यांच्या जोरावर शत्रूला जिंकणारे अनेक वीर-देश होवुन गेलेत परंतू हातात कोणतेही हत्यार व अस्त्र शस्त्र न घेता शत्रूला म्हणजे कोरोना ला जिंकन्याची ही पहिलीच वेळ आली असावी. कोरोना शी होणारया युद्धात आपन जिंकलो तर आपल्या देशाचे नाव इतिहासात अजरामर होइल. कारन कोरोना ला जगात अजुन पर्यंत कोणीही हरवलेले नाही. सर्व बलाढ्य देशांना जिंकत जिंकत त्याने आता भारतावर आक्रमण केलेले आहे. आपणही जोमाने त्याच्याशी लढत आहोत. ह्या युध्दात जर आपल्याला जिंकायचे असेल तर आपण आपल्या नगरीचे राजा म्हणजे आपले पंतप्रधान मा.ना. नरेंद्र जी मोदी साहेब यांचे हुकुम पाळायला पाहीजेत. तसेच आपले सरसेनापती मुख्यमंत्री मा.उद्धव जी ठाकरे साहेब,सेनापती मा.राजेश जी टोपे साहेब,मा.अनिलजी देशमुख साहेब,इतर सर्व सेनापती हया सर्वांचे आदेश पाळायला पहिजेत.सीमेवरच्या जवानां सारखी शिस्त आपण सैनिक म्हणून स्वताला लावुन घेतली पाहीजे तरच आपला विजय अटळ आहे. आपल्या देशाचे नाव अजरामर करण्याची ही सुवर्ण संधी आहे असे म्हटले तरी चालेल. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी-हिंदवी स्वराज्य स्थापन करण्या पासुन ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणी त्यानंतर स्वराज्य अबाधित राखण्यासाठी ज्या ज्या थोर पुरुषांनी क्रांती केली त्या त्या थोर पुरुषांना स्मरण करून थोडा वेळ आपले सर्व मतभेद बाजुला ठेवून देशासाठी आपल्या सर्वांच्या जिवासाठी “हंम सब एक है” अशी वज्रमुठ बांधून आपन सर्व एकत्र आलो आनी देशाचे सैनिक म्हणून घरातच बसण्याचे, कोणत्याही परिस्थितीत लॉक डाउन आहे तो पर्यंय शक्यतोवर बाहेर निघणार नाही, विनाकारण रस्त्यावर येणार नाही अशी आपली कर्तव्य बजावली तरच आपन कोरोना ला हरवू शकतो. आणी आपल्या देशाचा संपुर्ण विश्वात इतिहासा घडवू शकतो….. पी.के.महाजन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *