महाराष्ट्र २४ ऑनलाईन , दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणार्या असंघटीत कामगार आणि मजुरांचे हाल होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने त्यांना मदत करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी 1.5 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज घोषित केले जाणार असल्याची चर्चा आहे. या पॅकेजला अद्याप अंतिम रुप देण्यात आलेले नाही. पण या मुद्द्यावर पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँक यांच्यात चर्चा सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
2.3 लाख कोटींचे हे पॅकेज असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पण पॅकेज नेमके कितीचे यावर अद्याप खल सुरु आहे. शनिवारपर्यंत आर्थिक पॅकेजची घोषणा होऊ शकते. हे पैसे 10 कोटी जनतेच्या खात्यात थेट जमा होतील. लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका बसलेल्या व्यवसायांच्या मदतीसाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग असू शकतो. दरम्यान, सरकारने आगामी आर्थिक वर्षासाठी 7.8 लाख कोटींचे कर्ज घेण्याची योजना बनवली असल्याचेही वृत्त आहे.