महाराष्ट्र २४ ऑनलाईन , रोम : रोम, 26 मार्च : चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या कोरोनाने 175 देशांना विळखा घातला आहे. दिवसेंदिवस परिस्थितीत बिकट होत चालली आहे. सध्या सगळ्यात चीनहून सगळ्यात जास्त परिस्थिती चिंताजनक आहे ती इटलीची. एकीकडे चीनमध्ये रुग्ण निरोगी होत असताना इटलीमध्ये मात्र मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 7,503 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, जगभरात सध्या 4 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर 21 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
चीनच्या वुहानमध्ये ज्या प्रमाणे हा विषाणू वाऱ्यासारखा पसरला अशीच परिस्थिती इटलीतील लोंबार्दिया येथे झाली आहे. इटलीमधील या शहरात 3500हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं लोंबार्दिया शहरातील परिस्थिती भयंकर आहे. लोंबार्दिया शहराने चीनलाही मागे टाकले आहे. चीनच्या हुबेई प्रांतात 3160 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यापैकी एकट्या वुहान शहरातील 2500 रुग्ण होते. आता लोंबार्दिया या शहरात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. मृतांचा आकडा प्रत्येक तिसर्या दिवशी दुपटीने वाढत आहे.