Mumbai Unlock : मुंबई पुन्हा धावणार? फेब्रुवारी अखेरपर्यंत शंभर टक्के अनलॉक होण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ फेब्रुवारी । फेब्रुवारी महिनाअखेरीपर्यंत मुंबई शहर 100 टक्के अनलॉक होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई शहरात दैनंदीन कोरोना रुग्णवाढीचा दर आटोक्यात आला आहे. सध्या शहरात दररोज 500 पेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळून येत असून संपूर्ण शहरात सध्या केवळ एकच इमारत सील आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, येत्या आठवड्याभरात मुंबईत 100 टक्के नागरिकांचं कोरोना लसीकरण पूर्ण होणार असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पालिकेने हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृहं, नाटय़गृहं, थीम पार्क, स्विमिंग पूल 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली होती. तर, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये 50 टक्के उपस्थितीला परवानगी दिली आहे. यासोबतच लग्नसमारंभासाठी 200 जणांच्या उपस्थितला परवानगी आहे. मात्र, रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळं निर्बंध आणखी शिथिल करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवली

कोरोनाचा प्रादुर्भाव घटत असल्यानं मुंबईत पालिका क्षेत्रातील निर्बंध शिथील (Mumbai New Corona Guidelines) करण्यात आले आहेत. मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईतील समुद्र किनारे, गार्डन, पार्क खुले होणार आहेत. याशिवाय स्विमींग पूल, वॉटर पार्क, थिम पार्क 50 टक्के क्षमतेने सुरु होणार आहेत.

ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. मुंबईतील रुग्णसंख्या दोन दिवसापासून हजाराच्या आत आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या आता नियंत्रणात आल्याने मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. लग्नसोहळे आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नव्या नियमावलीनुसार, काय बंद, काय सुरु?

पर्यटनस्थळे, आठवडी बाजार, समुद्रकिनारे, गार्डन, पार्क सुरु राहणार
अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेनं सुरु होतील.
हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहांची 50 टक्के क्षमतेनं सुरु
लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी
भजन, धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांना 50 क्षमतेनं परवानगी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *