Nitesh Rane: नितेश राणे यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारना ; सीपीआर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० फेब्रुवारी । संतोष परब हल्लाप्रकरणात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जामीन मंजूर झालेले भाजप आमदार नितेश राणे यांची प्रकृती आता झपाट्याने सुधारताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांच्या छातीत दुखत होते. त्यामुळे चांगल्या ह्रदयरोग तज्ज्ञांकडून उपचार करवून घेण्यासाठी नितेश राणे (Nitesh Rane) यांना ओरोस जिल्हा रुग्णालयातून कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले होते. कालपर्यंत नितेश राणे यांना छातीच्या दुखण्यासोबत उलट्यांचा आणि स्पॉन्डिलाइटिसचा प्रचंड त्रास जाणवत होता. मात्र, सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर नितेश राणे यांना आज लगेचच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. थोड्याचवेळात नितेश राणे सीपीआर रुग्णालयातून सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना होतील. सिंधुदुर्गात आल्यानंतर नितेश राणे यांची ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी होईल. त्यानंतर नितेश राणे जामिनाचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी सावंतवाडी कारागृहात जातील. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नितेश राणे यांची जामिनावर सुटका होईल. त्यामुळे नितेश राणे आजच आपल्या घरी परतण्याची शक्यता आहे.

आमदार नितेश राणे आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला होता. हा सशर्त जामीन आहे. त्यानुसार नितेश राणे आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांना पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत कणक ली तालुक्यामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच या दोघांनाही ओरोस पोलीस ठाण्यात आठवड्यातून एकदा हजेरी लावावी लागणार आहे. शिवाय तपास कामात पोलिसांना गरज भासल्यास सहकार्य करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने या दोघांचीही प्रत्येकी ३० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *