नोकरीची सुवर्णसंधी ; 10वी उत्तीर्णांनासाठी मध्य रेल्वेत बंपर भरती; लगेच करा अप्लाय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० फेब्रुवारी । मध्य रेल्वे मुंबई (Central Railway – Railway Recruitment Cell Mumbai) इथे लवकरच दहावी उत्तीर्णांच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Central Railway Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती (Central Government railway Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (Railway Recruitment 2022) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

शिकाऊ उमेदवार (अप्रेन्टिस) – एकूण जागा 2422

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शिकाऊ उमेदवार (अप्रेन्टिस) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स यापैकी कोणत्याही ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना शिक्षणादरम्यान 50% मार्क्स असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

शिकाऊ उमेदवार (अप्रेन्टिस) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे वयवर्षे 15 ते 24 या दरम्यान असणं आवश्यक आहे.

भरती शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी – 100/- रुपये

मागासवर्गासाठी – फी नाही.

अशी होणार निवड

गुणवत्ता यादी बेस. (मॅट्रिकमधील गुणांच्या % (किमान 50% एकूण गुणांसह) + ज्या ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप करायची आहे त्यामधील आयटीआय गुण. मॅट्रिक आणि आयटीआयमधील गुणांच्या साध्या सरासरीच्या आधारावर पॅनेल असेल.

या ठिकाणी मिळणार नोकरी

मुंबई

नागपूर

भुसावळ

पुणे

सोलापूर

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *