महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० फेब्रुवारी । सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारीही पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणताही बदल केला नाही. आज जाहीर झालेले तेलाचे दर तीन महिन्यांहून अधिक काळ स्थिर आहेत. दरात वाढ झाली नसली तरी देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर आजही 100 रुपयांपेक्षा जास्त आहेत.
देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर गेल्यानंतर मोदी सरकारने 4 नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांनी कमी केले होते. कंपन्यांनी 4 नोव्हेंबरपासून किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सरकारने 15 जून 2017 पासून बाजारात तेलाच्या किमती लागू केल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या किंमती आता दररोज निश्चित केल्या जातात. (Check Today’s Petrol Diesel Price Updates)
हेही वाचा: राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर! तुमच्या शहरातील आजचे दर काय?
तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती
शहराचे नाव… पेट्रोल … डिझेल
– दिल्ली- 95.41- 86.67 रुपये
– मुंबई-109.98- 94.14 रुपये
– पुणे- 109.72- 92.50 रुपये
– नाशिक- 109.79-92.57 रुपये
– रत्नागिरी- 110.97-93.68 रुपये
– अमरावती- 111.14- 93.90
– औरंगाबाद- 110.38-93.14 रुपये
– नागपूर- 110.10-92.90 रुपये
– सातारा- 110.03-93.88 रुपये
– सांगली-109.65-92.83 रुपये
– वाशिम- 110.71-93.49 रुपये
– अहमदनगर- 110.12-92.90 रुपये
– रायगड- 109.48- 92.25 रुपये
– सोलापूर- 110.57-93.34 रुपये
– सांगली- 110.03-92.83 रुपये
– कोल्हापूर- 111.09-92.89 रुपये
– गडचिरोली- 110.53-93.32 रुपये
-परभणी- 112.49-95.17 रुपये
– पालघर- 109.75-92.51 रुपये
– कोल्हापूर- 110.09-92.89 रुपये