लॉकडाऊन : संचारबंदी मोडली तर होणार दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन; मुंबई : कोरोनाचे संकट पळवून लावण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच कोणीही घराबाहेर पडू नये म्हणून कर्फ्यू अर्थात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जर कोणी संचारबंदीचे उल्लंघन केले किंवा ती मोडली तर दोन वर्षांपर्यंतची जेल होऊ शकते. तसा आदेश केंद्र सरकारने लागू केला आहे. देशव्यापी २१ दिवसांचा संचारबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचं केंद्रीय गृह मंत्रालयान ठरवले आहे. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्याला आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा करण्यात येणार आहे.

या २१ दिवसांच्या लोकडाऊन दरम्यान राज्यात आणि केंद्रशासित प्रदेश आणि मधली सर्व सरकारी-निमसरकारी कार्यालयबंद राहतील. तसेच खाजगी कार्यालय देखील बंद राहणार आहेत. त्यामुळे काम नसताना कोणी संचारबंदीचे उल्लंघन केले तर त्यांचे काही खरं नाह. मात्र नव्या सूचनांनुसार किराणामालाच दुकान, दूध आणि दुग्धजन्य पदार्थची विक्री करणारी दुकान, पेट्रोल पंप गॅस सिलिंडर विक्री दुकान खुली राहतील. या जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरवण्याला जिल्हा प्रशासनाने प्रोत्साहन द्यावे, असेही गृहमंत्रालयाने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *