Income Tax: करदात्यांसाठी बातमी ! आता वर्षातून इतक्या वेळाच ITR अपडेट करता येणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १० फेब्रुवारी । जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. अलीकडेच आयटीआर फाइलिंगबाबत नवीन अपडेट आले आहे. आता करदात्याला त्याचे इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) मूल्यांकन वर्षातून एकदाच अपडेट करण्याची परवानगी असेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष जेबी महापात्रा यांनी बुधवारी ही माहिती दिली.

माहितीनुसार, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात महापात्रा म्हणाले की, या तरतुदीचा उद्देश अशा लोकांना संधी देणे आहे जे कोणत्याही वैध कारणामुळे आयटीआर भरू (ITR filing) शकले नाहीत. महापात्रा म्हणाले की असे करदाते मूल्यांकन वर्षातून एकदाच अपडेट रिटर्न भरण्यास सक्षम असतील.

अर्थसंकल्प 2022-23 मध्ये, करदात्यांना आयटीआर दाखल केल्याच्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत ‘अपडेट’ करण्याची मुभा देण्यात आली आहे, ज्याने रिटर्नमध्ये काही चुका केल्या आहेत किंवा कोणतेही तपशील वगळले आहेत. करदाते कर भरून आयटीआर अपडेट करू शकतील. अपडेट आयटीआर 12 महिन्यांच्या आत भरल्यास थकबाकी कर आणि व्याजावर अतिरिक्त 25% भरावे लागतील.

अपडेटेड आयटीआर (Income tax return) 12 महिन्यांनंतर भरल्यास कर आणि व्याजावरील पेमेंट 50 टक्क्यांपर्यंत वाढेल. परंतु, ते संबंधित मूल्यांकन वर्षाच्या 24 महिन्यांच्या आत दाखल करणे आवश्यक आहे. जर कोणत्याही मूल्यांकन वर्षासाठी नोटिसा बजावून खटला चालवण्याची कार्यवाही सुरू केली असल्यास करदात्याला या सुविधेचा लाभ मिळणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *