Gold Silver Price Today ; सोने-चांदी महागले, जाणून घ्या आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ फेब्रुवारी । महागाई आणि भांडवली बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीममधील तेजी कायम आहे. सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. चार सत्रात सोने सरासरी ९०० रुपयांनी महागले असून ४९ हजार रुपयांच्या समीप पोहोचले आहे. देशभरातील प्रमुख सराफा बाजारात देखील सोन्याचा भाव २०० ते ४५० रुपयांनी वाढला आहे. Gold Price Rally Continue On Fourth Consecutive Day)

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर गुरुवारी बाजार बंद होताना १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८९६७ रुपये इतका होता. त्यात ३०७ रुपयांची वाढ झाली. त्याआधी बुधवारी सोन्याचा भाव २४१ रुपयांनी वाढला आणि तो ४८६७० रुपयांवर बंद झाला होता.

एक किलो चांदीचा भाव ६२२२५ रुपये इतका आहे. त्यात ५३७ रुपयांची वाढ झाली आहे. बुधवारच्या सत्रात चांदीने तेजीची वाट धरली. चांदी ३५७ रुपयांनी महागली होती आणि एक किलोचा भाव ६२७२४ रुपये इतका झाला होता. मंगळवारी चांदीला नफावसुलीचा फटका बसला होता. इंट्रा डेमध्ये चांदीमध्ये ६०० रुपयांची घसरण झाली होती मात्र शेवटच्या काही तासांत खरेदीचा ओघ वाढला आणि चांदीचा भाव ६२३७० रुपयांवर स्थिरावला होता.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५८०० रुपये इतका वाढला आहे. त्यात गुरुवारच्या तुलनेत २५० रुपयांची वाढ झाली. २४ कॅरेटचा भाव ४९९७० रुपये इतका आहे. त्यात २८० रुपयांची वाढ झाली आहे. आज दिल्ली सराफा बाजारात सोने ३९० रुपयांनी महागले आहे. दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५८०० रुपये इतका आहे. त्यात ३९० रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ४९९७० रुपये असून ते ४३० रुपयांनी महागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *