CSK IPL 2022 Auction: चेन्नईची सुपर टीम, धोनीच्या धुरंधर सेनेबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ फेब्रुवारी । आयपीएल 2022 मेगा ऑक्शनची (IPL Mega Auction 2022) संपूर्ण प्रक्रिया काल पूर्ण झाली. आता सर्वांच लक्ष आपल्या आवडत्या संघाने कुठले नवीन खेळाडू संघात घेतले, याकडे आहे. जवळपास सर्वच संघांनी आपल्या सक्वॉडमध्ये पूर्ण खेळाडू भरले आहेत. यावेळी मेगा ऑक्शनमध्ये दहा संघांनी बोली लावली. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ आयपीएलमध्ये दाखल झाले आहेत. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन यशस्वी संघ आहेत. त्यामुळे या दोन टीम्सनी संघाची बांधणी कशी केली आहे? कुठल्या खेळाडूंना संघात घेतलय? हे जाणून घेण्याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुक्ता आहे. नियमानुसार प्रत्येक फ्रेंचायजीला चार खेळाडूंना रिटेन करता येणार होतं. त्यामुळे सर्वच संघांच्या महत्त्वाच्या खेळाडूंवर ऑक्शनमध्ये बोली लागली. चेन्नई सुपर किंग्सला आपल्या जुन्या खेळाडूंना पुन्हा संघात घेण्यात बऱ्यापैकी यश मिळालं. चेन्नई सुपर किंग्जने पहिल्यांदाच खेळाडू विकत घेण्यासाठी 10 कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च केली. पूर्वीपासून CSK कडून खेळत असलेल्या दीपक चहरसाठी चेन्नईने 14 कोटी रुपये मोजले. त्यामुळे तो एमएस धोनीपेक्षा महागडा बनला.

असा आहे एमएस धोनीने बांधलेला नवीन संघ

रवींद्र जडेजा-16 करोड (रिटेन)

एमएस धोनी-12 करोड (रिटेन)

मोइन अली- 8 करोड (रिटेन)

ऋतुराज गायकवाड़- 6 करोड (रिटेन)

दीपक चाहर- 14 करोड रुपये

अंबाती रायडू-6.75 करोड रुपये

ड्वेन ब्रावो- 4.40 करोड रुपये

शिवम दुबे- 4 करोड

क्रिस जॉर्डन- 3.6 करोड

रॉबिन उथप्पा- 2 करोड रुपये

मिचेल सैंटनर- 1.90 करोड

एडम मिल्न- 1.90 करोड

राज्यवर्धन हंगरगेकर, 1.50 करोड

प्रशांत सोलंकी- 1.20 करोड

डेवॉन कॉनवे-1 करोड

महीष तीक्ष्णा- 70 लाख

ड्वेन प्रिटोरियस- 50 लाख

तुषार देशपांडे, 20 लाख

केएम आसिफ, 20 लाख

सिमरजीत सिंह- 20 लाख

मुकेश चौधरी- 20 लाख

सी हरि निशांत- 20 लाख

एन जगदीशन- 20 लाख

के भगत वर्मा- 20 लाख

सुभ्रांशु सेनापति- 20 लाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *