महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ फेब्रुवारी । आयपीएल 2022 साठी बंगळूर येेथे रंगलेल्या महालिलावात रविवारी दुसर्या दिवशीही खेळाडूंवर कोट्यवधी रकमेची उधळण झाली. इंग्लंडचा लियम लिविंगस्टोन हा आतापर्यंतचा यंदाच्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंजाब किंग्जने लियम लिविंगस्टोन साठी तब्बल 11.50 कोटी रुपये मोजले. इंग्लंडचा जोफ्रा आर्चर आता मुंबई इंडियन्समधून जसप्रीत बुमराहच्या जोडीने गोलंदाजी करताना दिसेल. 8 कोटींच्या किमतीत मुंबईने त्याला राजस्थानकडून आपल्याकडे घेतले.
सिंगापूर या असोसिएटेड देशातील खेळाडू टिम डेव्हिड याला मुंबईने निवडले. यासाठी मुंबईने 8.25 कोटी रुपये खर्च केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. डेव्हिड हा हार्दिक पंड्याची रिप्लेसमेंट मानली जातो. याचबरोबर अंडर-19 विश्वचषक विजेत्या खेळाडूंवरही चांगल्या बोली लागल्या. तुळजापूरचा राजवर्धन हंगर्गेकर याला दीड कोटी रुपयांना धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने विकत घेतले. तर अष्टपैलू राज बावा याला दोन कोटी रुपयांना पंजाबने आपल्याकडे खेचले.
इंडियन प्रीमिअर लीगच्या महालिलाव रविवारी दुसर्या दिवशी सुरू झाला असून इंग्लंडचा लियम लिविंगस्टोन ठरला महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे. लियम लिविंगस्टोन यासाठी पंजाब किंग्जने तब्बल 11.50 कोटी रुपये मोजले. दुसर्या दिवशीच्या लिलावात तो सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे. मागील सिझनमध्ये सनरायझर्स हैदराबादने लियमवर 2 कोटींची बोली लावली होती.