ऐतिहासिक ‘रामसेतू’वरून नाशिककर विरुद्ध स्मार्ट सिटी प्रशासन आमने-सामने

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ फेब्रुवारी । नाशिक (Nashik) महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीच्या तोंडावर ऐतिहासिक रामसेतू (Ramsetu) पुलावरून एक नवीनच वाद निर्माण झाला असून, त्यामुळे नाशिककर विरुद्ध स्मार्ट सिटी प्रशासन असा सामना रंगताना दिसतोय. नाशिकमध्ये स्मार्ट सिटीची कामे अतिशय संथ गतीने सुरू आहेत. त्याचा रोष प्रशासनाला पत्करावा लागतोयच. सोबतच प्रशासनाने आता पंचवटीतील ऐतिहासिक असा रामसेतू पूल पाडण्याची भूमिका घेतलीय. त्यामुळे नागरिक आक्रमक झाले असून, त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. यापूर्वी नाशिकमधील उंटवाडी येथील अडीचशे वर्षे जुना वटवृक्ष उड्डाणपुलासाठी तोडण्याचा निर्णय झाला होता. यालाही नाशिककरांनी रस्त्यावरून उतरून विरोध केला. याप्रकरणात थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष घातले. त्यांनी या झाडाला भेट दिली. हा पुरातन वटवृक्षत तोडणार नाही, असे आश्वासन दिले. महापालिका आयुक्तांना तशा सूचना दिल्या. त्यानंतर हे आंदोलन शमले आहे.

प्रशासन काय म्हणते?

गोदावरी तीरावर 60 वर्षांपूर्वी रामसेतू बांधला. मात्र, या भागात नेहमी गर्दी असते. कुंभमेळा, यात्रा यासाठी देशविदेशातून भाविक हजेरी लावतात. मात्र, महापालिकेने स्ट्रक्चर ऑडिट करून हा पूल वाहतुकीसाठी बंद केलाय. तो तसाच ठेवला, तर धोका उद्भभवू शकतो. तो कधीही कोसळू शकतो. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे यांनी केला आहे. त्यामुळे हा पूल पाडणे गरजेचे आहे. त्याला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *