भारत सरकारकडून पुन्हा ५४ चिनी अ‍ॅप्सवर बंदी; अनेक लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश, वाचा संपूर्ण यादी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ फेब्रुवारी । केंद्र सरकारने ५४ हून अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचे ताजे आदेश जारी केले आहेत. या अॅप्सपासून भारतीयांच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला धोका आहे, असे हा निर्णय जारी करताना अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, यापैकी बरेच अॅप्स Tencent, Alibaba आणि गेमिंग फर्म NetEase सारख्या मोठ्या चिनी तंत्रज्ञान कंपन्यांचे आहेत आणि २०२० पासून भारतात बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सचे नामांतर केलेले किंवा दुसऱ्या ब्रँडच्या नावाखाली नव्याने लाँच केलेले आहेत.

ईकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे अॅप्स चीनसारख्या परदेशातील सर्व्हरवर भारतीयांचा संवेदनशील डेटा ट्रान्सफर करत असल्याच्या कारणावरून इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने ताज्या बंदी आदेश जारी केला. गुगलच्या प्ले स्टोअरसह टॉप अॅप स्टोअरनाही हे अॅप्लिकेशन ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “प्ले स्टोअरवर भारतात ५४ अॅप्स आधीच ब्लॉक करण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी Meity ने माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६९ अ अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर केला आहे.

पहिल्यांदा जेव्हा चिनी अॅप्सवर बंदी घातली तेव्हा ५९ अॅप्सचा समावेश होता. ज्यात TikTok, Shareit, WeChat, Helo, Likee, UC News, Bigo Live, UC Browser, ES File Explorer आणि Mi Community सारख्या लोकप्रिय ऍप्लिकेशन्सचा समावेश आहे. नंतर नोव्हेंबरमध्ये, स्नॅक व्हिडिओ, AliExpress आणि AliPay कॅशियरसह आणखी ४३ चीनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये सरकारने आणखी ११८ अॅप्सवर बंदी घातली.

बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सची यादी खालीलप्रमाणे…

Sweet Selfie HD, Beauty Camera, Selfie Camera, Equalizer, Bass Booster, CamCard for SalesForce Ent, Isoland 2: Ashes of Time Lite, Viva Video Editor, Tencent Xriver, Onmyoji Chess, Onmyoji Arena, AppLock and Dual Space Lite या अॅप्सवर बंदी घालण्याची घोषणा सरकारने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *