यु ट्यूब झाले १८ व्या वर्षात पदार्पण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १४ फेब्रुवारी । १४ फेब्रुवारी जगभरात व्हेलेंटाइन दिवस म्हणून साजरा होत आहे. विशेष म्हणजे याच दिवशी म्हणजे १४ /२/ २०२२ रोजी लोकप्रिय व्हिडीओ शेअरिंग सोशल मिडिया प्लॅटफॉर्म, युट्युब वयाची १७ वर्षे पूर्ण करून १८ व्या वर्षात पदार्पण करत आहे. २००५ मध्ये पे पालचे तीन माजी कर्मचारी स्टीव चेन, चाड हर्ले आणि जावेद करीम यांनी ‘ट्यून इन हुक अप’ नावाच्या व्हिडीओ डेटिंग साईट स्वरुपात ते पेश केले होते. ९ ऑक्टोबर २०१६ मध्ये गुगलने यु ट्यूब १.६५ अब्ज डॉलर्स मध्ये खरेदी केले. या साईटवर पहिला व्हिडीओ २३ एप्रिल २०१५ मध्ये जावेद करीम यांनी अपलोड केला होता तो एका प्राणीसंग्रहालयाचा होता.

आज युट्युब गुगल नंतर सर्वाधिक सर्च केली जाणारी दुसरी वेबसाईट आहे. युट्यूबचे मासिक युजर्स २अब्ज पेक्षा जास्त असून दर महिना ६ अब्ज तास तर दररोज ४ अब्ज व्हिडीओ यावर पाहिले जातात. २०२० मध्ये युट्युबची कमाई १९.८ अब्ज डॉलर्स होती.२००८ मध्ये प्रथम युट्यूबवर युजर्स ‘एप्रिल फुल’ प्रँक करण्याची प्रथा सुरु झाली आणि आजही ती सुरु आहे. २०२१ मध्ये युट्युबचा महसूल २८.८ अब्ज डॉलर्स होता.

असे सांगतात कि युट्युबवर आज जेवढे व्हिडीओ उपलब्ध आहेत ते सर्व पहायचे ठरविले तर ६० हजार वर्षे लागतील. युट्यूब वर दर मिनिटाला ५०० तासाचा कंटेंट पेक्षा जास्त दराने व्हिडीओ अपलोड केले जात आहेत. युट्यूबवर सर्वाधिक सर्च होणारे विषय आहेत, ‘कीस कसा करावा’, टाय कसा बांधावा’ आणि सर्वात लोकप्रिय सर्च विषय आहे संगीत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *