शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश जारी, यंदाच्या जयंतीला नियमावली काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १४ फेब्रुवारी । छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapti Shivaji Mahraj) यांच्या जंयती (Shivjayanti 2022) निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी आज मान्यता दिली. तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. येत्या शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

यंदाची शिवजयंती धूमधडाक्यात

गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे कोणताही सण, उत्सव हा नेहमीसारखा मोकळेपणाने साजरा करता आलेला नाही. कोरोनामुळे दोन वर्षातल्या प्रत्येक सण उत्सव, जयंतीवर काही ना काही निर्बंध राहिले आहेत. त्यामुळे किमान यंदा तरी शिवजयंतीसाठी निर्बंध शिथिल असावेत अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर लोकांच्या मागणीचा विचार लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी मोठी दिलासा देत. ही नवी नियमावली जारी केली आहे. त्यामुळे यंदाची शिवजयंती धूमधडाक्यात पार पडणार आहे.

तिसऱ्या लाटेला ब्रेक लावला

काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर पुन्हा वाढल्याने शिथिल झालेले निर्बंध पुन्हा कडक करावे लागले होते. मात्र लसीकरण झाल्याने आणि लोकांमध्ये चांगल्या प्रकारची इम्युनिटी तयार झाल्याने कोरोनाची तिसरी लाट जास्त झळ पोहोवू शकली नाही, पाहता पाहता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला ब्रेक लागताना दिसून आला. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कडक केलेले निर्बंध पुन्हा शिथिल होऊ लागले आहेत. जग पुन्हा हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. तिसऱ्या लाटेल सुरूवातील मुंबईतील कोरोना रुग्णांचे आकडे पाहून धडकी भरत होती. मात्र मुंबईने पुन्हा मुंबई पॅटर्न दाखवत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला ब्रेक लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *