Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर विचित्र अपघात, चौघांचा जागीच मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ फेब्रुवारी । मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात (Major accident on Mumbai Pune Expressway) झाला आहे. सहा गाड्या एकमेकांना धडकल्याने विचित्र अपघात (six vehicle rammed into each other) झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या लेनवरील खोपोली जवळ हा भीषण अपघात (Accident near Khopoli) झाला आहे.कार, कंटेनरसह चार वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. दोन कंटेनरच्या मधोमध कार अडकल्याने अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, चार जणांचा जागीच मत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत आणि पाच किरकोळ जखमी झाले आहेत.

जखमींना पनवेलच्या एम जी एम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी महाराष्ट्र सुरक्षा दल ,देवदूत रेस्क्यू टीम आणि खोपोली, खंडाळा, महामार्ग पोलीस दाखल झाले आहेत. या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

या सहा गाड्यांमध्ये झाला विचित्र अपघात

एकूण सहा गाड्यांमध्ये हा अपघात झाला आहे. यामध्ये दोन कंटेनर, एक वेन्यू कार, एक ट्रक, एक आयशर टेम्पो आणि एका स्विफ्ट गाडीचा समावेश आहे. या अपघातात वेन्यू कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, अद्याप या अपघाताचं नेमकं कारण समोर येऊ शकलेलं नाहीये.काही दिवसांपूर्वी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला होता. 1 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. भरधाव कंटेनर वळणा पलटी झाला आणि 15 ते 20 फूट दूर फरफटत गेला. या अपघातात कंटेनरने रिक्षाला जोरदार धडक दिली. हा भीषण अपघात तेथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अंगावर काटा आणणारा हा सीसीटीव्ही आता समोर आला आहे.

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र साठे मिसळजवळ पुण्यावरून मुंबईकडे अतिवेगाने जाणारा कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. त्याच वेळेस खंडाळ्यातून लोणावळच्या दिशेने जाणाऱ्या पॅसेंजर रिक्षाला या कंटेनरची धडक बसली. या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *