शॉर्टसर्किटमुळे चालत्या ट्रकने घेतला पेट; नागरीकांची धावपळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ फेब्रुवारी । जळगाव : नशिराबाद येथील पुठ्ठा फॅक्टरीतून निघालेल्या खाली ट्रकच्या कॅबीनला बॅटरीच्या शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. आग लागल्याचे कळताच जवळ असलेल्या टोल नाक्यावरील कर्मचारी आणि नशिराबाद (Nashirabad) पोलीसांनी धाव घेवून आग विझविली. (jalgaon news national highway running truck took a beating due to a short circuit)

राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद टोल नाक्‍याजवळ गायत्री पेपर मिल ही पुठ्ठा फॅक्टरी आहे. धुळे (Dhule) येथून पुठ्ठा घेवून आलेला ट्रक (एमएच १८ एम ९६२) हा सोमवारी (१४ फेब्रुवारी) सांयकाळी फॅक्टरीत खाली करण्यात आला. त्यानंतर फॅक्टरीत पुठ्ठा खाली केल्यानंतर ट्रक पुन्हा धुळ्याकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर मार्गस्‍थ झाला. त्याचवेळी ट्रकच्या बॅटरीत शॉर्टसर्कीट झाल्याने चालत्या ट्रकच्या कॅबिनमध्ये आग (Fire) लागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *