रेल्वे होणार कुरियर बॉय! डिलिव्हरी सर्व्हिससाठी रेल्वेचे खास अॅप्लिकेशन येणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ फेब्रुवारी । देशाच्या कोणत्याही भागातून आपल्या आवडीची वस्तू किंवा पदार्थ मागवण्यासाठी कुरिअर कंपन्यांवर अवलंबून राहावं लागतं. ग्राहकाला जास्तीत जास्त चांगली आणि वेळेत सुविधा देण्यासाठी त्यांच्यात चढाओढ असते. या स्पर्धेत आता भारतीय रेल्वेही उतरणार आहे.

सध्या कोरोनाच्या काळात लॉजिस्टिक्स क्षेत्र वेगाने पसरत आहे. त्याचा फायदा घेण्याचा रेल्वेचा मानस असून नागरिकांना कुरिअर सेवा देण्यासाठी रेल्वे खास अॅप्लिकेशन विकसित करणार आहे. या अॅपद्वारे क्युआर कोडच्या माध्यमातून त्यांना कुरिअर सेवा पुरवण्याविषयी रेल्वेचा विचार सुरू आहे.

त्यासाठी रेल्वेने झोन पातळीवर अशा प्रकारच्या सेवेसाठीचे मॉड्युल विकसित करण्याचे आदेश दिले आहेत. ते विकसित झाल्यानंतर दिल्ली एनसीआर आणि गुजरात येथील सानंद परिसरात ही सेवा जून-जुलै महिन्यांत सर्वप्रथम सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्यानंतर एक मॉड्युल मुंबईतही विकसित होईल. प्रायोगिक तत्वावर ही मॉड्युल्स राबवण्यात येतील.

या कुरिअर सेवेत आधी व्हाईट गुड्स (फ्रिज, वॉशिंग मशीन इत्यादी), छोट्या वस्तूंचा पुरवठा आणि त्यांचे पुरवठादार यांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. ग्राहकांना त्यांचं पार्सल एखाद्या विशिष्ट ठिकाणाहून उचलणे किंवा घरी/कार्यालयात मागवणे असे दोन पर्याय उपलब्ध करून दिले जातील. त्यांना क्युआर कोडच्या साहाय्याने त्यांचं पार्सल ट्रॅकही करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *