महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ फेब्रुवारी । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) राजकीय तणाव वाढत आहे. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होत असताना आज शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला शिवसेनेचे महाराष्ट्रातील बडे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. एकंदरीतच संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. मनसेचे संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी देखील एक सूचक ट्विट केलं आहे, त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता तुम्हीच पाहा हे काय ट्विट आहे? आणि तुम्हीच ठरवा, याचा काय अर्थ घेता येईल?
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर एक ट्विट केलंय. आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून त्यांनी नाव न घेता शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ज्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. या ट्विटवर सध्या लाईक्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1493553296375644162?s=20&t=771jx9SI3Cm_IOFm02Ja8Q