‘सरकार पाडायचंय त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनाच गैरवापर’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ फेब्रुवारी । मला असं वाटतंय ही आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आहे. आपल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यांना वंदन करतो, अभिवादन करतो, कारण या वास्तूला एक महत्व आहे. अनेक लढे शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली आम्ही या वास्तूतून सुरु केले आहेत.

सर्वांनी आजच्या पत्रकार परिषदेला आशिर्वाद दिले आहेत, पुढे व्हा, महाराष्ट्रावर मराठी माणसावर ज्या पद्धीतने आक्रमण सुरु आहे, त्या आक्रमणाविरुद्ध कोणीतरी रणशिंग फुकायला हवं होतं, ते या ऐतिहासिक वास्तूतून फुंकतो आहे. बाळासाहेबांनी आम्हाला एक मंत्र दिला. तो आयुष्यभराचा मंत्र आहे, ते नेहमी सांगायचे, तु काया पाप केलं नसशील तर कोणाच्या बापाला घाबरु नका. याच पद्धतीने उद्धव ठाकरे पुढे घेऊन जात आहेत.

आजची पत्रकार परिषदेत आम्हाला संदेश द्यायचा आहे, महाराष्ट्र गांडुची अवलाद नाही, मराठी माणूस बेईमान नाही, आणि तुम्हीही कितीही नामर्दांगी करुन आमच्या पाठिवार वार केलेत तरी शिवसेना घाबरणार नाही. यासाठी ही पत्रकार परिषद आहे.

गेल्या काही दिवसापासून आपण पहाताय, शिवसेना असेल, ठाकरे कुटुंब असतील, अनेक आमचे शिवसेनेचे प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, सर्वांना केंद्रीय तपास यंत्रणा हल्ले करतायत, हे महाराष्ट्रावरच नव्हे तर देशावरचं संकट आहे, पश्चिम बंगालवरसुद्धा असंच संकट आहे.

महाराष्ट्र सरकार त्यांना पाडायचं आहे, घालवायचं आहे, त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनाच गैरवापर सुरु आहे. खोटे आरोप, बदनाम्या, केंद्रीय तपास यंत्रणांना दबाव, एकतर तुम्ही सरेंडर व्हा, नाहीतर सराकर आम्ही घालवू अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. भाजपचे नेते सतत तारखा देत आहे. १७०चं बहुमत असताना भाजपचे नेते तारखा देत आहेत. हे कुणाच्या भरवश्या तारखा देत आहेात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *