हवेत धावणार बस ! नितीन गडकरी यांचा आणखी एक ड्रीम प्रोजेक्ट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १६ फेब्रुवारी । Nitin Gadkari’s dream project : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आणखी एका ड्रीम प्रोजेक्टची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचाराच्यावेळी ही माहिती गडकरी (Nitin Gadkari’) यांनी दिली. खांबाच्या सहाय्याने हवेत बस धावणार आहे. काय आहे हा प्रकल्प, ते जाणून घ्या.

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मंगळवारी प्रयागराजमध्ये प्रचार केला आणि सिद्धार्थनाथ सिंह यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेतली. यादरम्यान त्यांनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल सांगितले. तसेच यासोबतच त्यांनी प्रयागराजमध्ये एअर बसेस चालवण्यात येणार असल्याचे सांगितले.

प्रयागराजमध्ये रस्त्यावर खांब उभारण्यात येणार आहेत. त्यांच्या मदतीने बसेस धावतील. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येत आहे. यासोबतच नितीन गडकरी म्हणाले की, नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनाही ही माहिती दिली आहे.

त्रिवेणीच्या संगमावर सी प्लेन उतरावे, असे माझे स्वप्न आहे. मला सी प्लेन दिल्लीहून टेक ऑफ करून संगम येथे उतरवायचे आहे. या प्रकल्पाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 18 आसनी विमानाची किंमत 18 कोटी रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. प्रयागराजमध्ये विमानतळ आहे. आता येथे रिव्हरपोर्टही तयार होणार आहे. केंद्र सरकारने गेल्या सात वर्षांत 40 रिव्हरपोर्ट बांधले आहेत.

नितीन गडकरी म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी उसाची लागवड करतात आणि ऊसापासून इथेनॉल तयार केले जाते. मी नवीन धोरण आणले आहे, ज्यामध्ये वाहने फ्लेक्स इंजिनवर चालतील. आता प्रति लिटर पेट्रोल 110 रुपयांऐवजी 62 रुपये प्रतिलिटर ग्रीन बायोइथेनॉलने कार चालणार असून त्यामुळे प्रदूषणही होणार नाही.

नितीन गडकरी यांनी पत्रकारांना सांगितले की, उत्तर प्रदेशमध्ये 2014 ते 2021 या कालावधीत 90,000 कोटी रुपये खर्चून 4,722 किमी रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर 1,60,000 कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात गेल्या तीन वर्षांत शेतकऱ्यांना 26 हजार कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आले आहेत. त्याचवेळी, 13,000 कोटी रुपये खर्चून 16 बायपास आणि 15,000 कोटी रुपये खर्चून 20 नवीन बायपास बांधले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *