महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १६ फेब्रुवारी । साधारणपणे आपण पाहतो की, लोक वसंत ऋतूमध्ये (Spring Season) खूप आजारी पडतात. याच ऋतूमध्ये एकीकडे कडाक्याचं ऊन आणि दुसरीकडे थंडी सुरूच असते आणि हवामानातील या बदलामुळं खोकला, सर्दी, पचनशक्ती कमजोर होणं अशा समस्या येऊ लागतात. सध्या वसंत ऋतू सुरू झाला असून तुम्हालाही खोकला, सर्दीचा त्रास होत असेल तर आयुर्वेदातील काही गोष्टी नक्की (Spring Season Diet) लक्षात ठेवा. त्यांच्या मदतीनं या समस्या तुम्हाला टाळता येतील. आयुर्वेदानुसार (Ayurveda) या काळात कफ दोष वाढू लागतो. त्यामुळं या ऋतूत अग्नि तत्त्व कमी होऊ लागतं आणि नीट पचन न होण्याची समस्या वाढते. जाणून घेऊया वसंत ऋतूमध्ये तुम्ही तुमच्या आहारात काय बदल करून स्वतःला निरोगी (Healthy life) ठेवू शकता.
वसंत ऋतूमध्ये पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी आहाराची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
या ऋतूमध्ये शक्यतो जास्त खाणं टाळावं आणि भूक लागल्यावर जेवायला हवं.
वसंत ऋतूमध्ये आंबट, खूप खारट किंवा तेलकट पदार्थ खाऊ नयेत. असं केल्यानं कफ दोष वाढू शकतो.
पुरी-कचोरीसारखे जड पदार्थही या ऋतूत टाळावेत.
या ऋतूमध्ये जेवणानंतर दिवसा झोपू नये. कारण, याच्यामुळं कफ दोष वाढण्याची शक्यता असते.
वसंत ऋतूमध्ये निरोगी राहण्यासाठी टिप्स
आयुर्वेदानुसार या ऋतूत अन्नाची विशेष काळजी घेतल्यास कफाची वाढ होणं टाळता येतं.
या ऋतूमध्ये कडू रस असलेल्या कारलं, परवल, कडू चव असलेले पदार्थ जसं की, सूप आदी घेणं चांगलं.
या ऋतूत जड अन्न खाण्याऐवजी हलके अन्न खा, जे पचायला सोपं आहे. जसं की, मूग डाळ, खिचडी, दलिया आदी.
दुधी भोपळा, कोबी, गाजर, पालक, मटार यांसारख्या पौष्टिक घटकांचाही आहारात समावेश करावा.
या ऋतूत मध आणि कोमट पाण्याचे सेवन केल्यास कफदोषाची वाढ टाळता येते आणि सर्दी-खोकल्यात आराम मिळतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. )