संजय राऊत यांना प्रत्युत्तर देणार, आता किरीट सोमय्या-नारायण राणे मैदानात उतरणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १६ फेब्रुवारी । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारपरिषद घेऊन अनेक धक्कादायक आरोपांची राळ उडवून दिल्यानंतर आता भाजप पक्षही त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पुढे सरसावला आहे. त्यासाठी भाजपकडून सर्वप्रथम किरीट सोमय्या आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मैदानात उतरवले जाणार आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि नारायण राणे हे शिवसेनेचे सर्वात कडवे विरोधक मानले जातात. आतापर्यंत या दोन नेत्यांनी थेट ठाकरे कुटुंबीयांवरही टीका करण्यास मागेपुढे पाहिलेले नाही. नारायण राणे आणि शिवसेनेतील विळ्याभोपळ्याचे सख्य तर सर्वश्रुत आहे. त्यामुळे आज किरीट सोमय्या आणि नारायण राणे काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. किरीट सोमय्या यांची पत्रकारपरिषद सकाळी . तर केंद्रीय मंत्री नारायण राणे दुपारी ४ वाजता मुंबईतील भाजप मुख्यालयात पत्रकारपरिषद घेणार आहेत.

संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत भाजप पक्ष, ईडी आणि किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती टीका केली होती. पीएमसी बँक घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान याचे किरीट सोमय्यांशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. वाधवान हा सोमय्यांचा पार्टनर असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राकेश वाधवाने भाजपला २० कोटी रुपयांचा निधी दिला होता, असेही संजय राऊत यांनी म्हटले होते. इतके दिवस इतरांवर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनाच राऊतांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यामुळे आता किरीट सोमय्या या सगळ्यावर काय स्पष्टीकरण देणार, हे पाहावे लागेल.

महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जायला तयार आहे. महाविकासआघाडी सरकारकडे १७० आमदार आहेत. त्यामुळे तुम्ही लोकशाहीचे संकेत पायदळी कसे तुडवू शकता, असा सवाल मी भाजप नेत्यांना विचारला. महाराष्ट्रातील सरकार पाडायचा प्रयत्न केलात तर ठिणगी पडेल, असे मी त्यांना सांगितले. पण भाजपचे नेते म्हणाले की, असे काहीही होणार नाही. आम्ही महाराष्ट्रात केंद्रीय पोलीस दल आणून सर्व थंड करू, असे संजय राऊत यांनी सांगितले. महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी आम्ही एकतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणू किंवा काही आमदार फोडू. त्यामुळे तुम्ही महाविकासआघाडी सरकार वाचवण्याच्या फंदात पडू नका. अन्यथा केंद्रीय यंत्रणा तुम्हाला ‘टाईट’ करतील, अशी धमकी भाजपच्या नेत्यांनी मला दिल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *