SA vs NZ : दक्षिण आफ्रिकेवर, 90 वर्षांनंतर ओढावली नामुश्की

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १७ फेब्रुवारी । टीम इंडियाला पराभूत केल्यानंतर हवेत असलेलं दक्षिण आफ्रिकेचं विमान आता जमिनीवर आलं आहे. न्यूझीलंड विरूद्ध क्राईस्टचर्चमध्ये पहिल्या टेस्टमध्ये (South Africa vs New Zealand) आफ्रिकेची वाताहात झाली. आफ्रिकेची पहिली इनिंग फक्त 95 रनमध्ये संपुष्टात आली. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात 90 वर्षांनी आफ्रिकेची इनिंग 100 रनच्या आत संपुष्टात आली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरूद्ध 1932 साली मेलबर्न टेस्टमध्ये त्यांची इनिंग 36 रनवर संपुष्टात आली होती.

न्यूझीलंडकडून मॅट हेन्री (Matt Henry) सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याने फक्त 23 रन देत 7 विकेट्स घेतल्या. जेमिसन, साऊदी आणि वॅग्नरला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

भारताविरुद्धची टेस्ट सीरिज 2-1 अशी जिंकत मोठ्या आत्मविश्वासाने आफ्रिकेची टीम न्यूझीलंडमध्ये दाखल झाली होती. पण त्यांची पहिल्याच टेस्टमध्ये डळमळती सुरूवात झाली. त्यांच्या 7 बॅटर्सना दोन अंकी रन करता आले नाहीत. त्यांनी 40 रनच्या आताच पहिल्या 4 विकेट गमावल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेकडून जुबेर हमजानं सर्वाधिक 25 रन काढले. हेन्रीचा ट्रेंट बोल्टच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आला होता. त्याने होम ग्राऊंडवर कमाल करत आफ्रिकेला झटपट गुंडाळलं. टेस्ट कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच एका इनिंगमध्ये 5 किंवी त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याची कामगिरी हेन्रीनं केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *