सावध व्हा ! जेवणानंतर लगेच वॉशरूममध्ये धावताय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १७ फेब्रुवारी । जगात अशी दोन पद्धतीची लोकं असतात ज्यांना जेवल्यानंतर लगेच झोप येते तर दुसरे म्हणजे खाल्ल्यानंतर वॉशरूमला जाण्याची घाई असते. जर तुम्ही पहिल्या श्रेणीत येत असाल तर तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. मात्र जर तुम्हाला सतत वॉशरूमला जाण्याची वेळ येत असेल तर ही तुमच्या आरोग्यावर लक्ष देण्याची वेळ आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, अवेळी वॉशरूममध्ये जाण्याची सवय तुम्हाला पुढे जाऊन अनेक अडचणीत आणू शकते. त्यामुळे खाल्ल्यानंतर तातडीने वॉशरूमला जाण्याची वेळ का येते हे समजून घेणं गरजेचं आहे.

आहार
टॉयलेटला जाण्याची सवय ही तुमच्या आहारावर अवलंबून असते. सतत मसालेदार खाणं आणि कच्च सलाड खाल्ल्याने तुम्हाला टॉयलेटला जावं लागण्याची शक्यता असते. तर अधिक फायबरयुक्त सेवनाने लूज मोशनची समस्या उद्भवू शकते.

खाण्यामुळे एलर्जी
काही लोकांना विशिष्ठ खाद्यपदार्थांची एलर्जी असते. एलर्जीमुळे हे पदार्थ पचत नाहीत परिणामी तुम्हाला सतत वॉशरूमला जाण्याची समस्या येऊ शकते. यामध्ये मासे, नट्स, अंड यांचा समावेश आहे.

इर्रिटेबल बाउल सिंड्रोम
इर्रिटेबल बाउल सिंड्रोम हा आतड्यांचा सिंड्रोम आहे. यामध्ये पोटदुखी, बैचन वाटणं अशा तक्रारी समोर येतात. इर्रिटेबल बाउल सिंड्रोममुळे कोलोनद्वारे तुमच्या खाण्याची गती वाढू शकते. यामुळे तुम्हाला सतत टॉयलेटमध्ये जाण्याची वेळ येते

सीलिएक समस्या
सीलिएक समस्या ही एक इम्युन सिस्टीमशी संबंधित समस्या आहे. यामध्ये तुमच्या शरीराला ग्लुटेनची आवश्यकता असते. यामुळे तुमच्या छोट्या आतड्यांवर परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या आहारात योग्य त्या पदार्थांचा समावेश करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *