भारतात भाडेतत्त्वावर घेऊ शकता महिंद्राच्या गाड्या, जाणून घ्या नेमकी काय आहे योजना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ फेब्रुवारी । चारचाकी गाडी घेणं प्रत्येकाला परवडेल असं नाही. त्यामुळे कुठे फिरायला जायचं ठरलं की टूरिस्ट गाडी बूक करून जाता येतं. मात्र हा प्रवाससुद्धा तसा महागच पडतो. पण दारात गाडी नसल्याने हा पर्याय सोयीस्कर ठरतो. मात्र आता महिंद्राच्या गाड्या चालवण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण कंपनीने व्हेइकल अँड लीजिंग सब्सस्क्रिप्शन प्लॅटफॉर्म क्विकलीजसोबत करार केला आहे. या माध्यमातून महिंद्रा ऑटोच्या पोर्टल आणि डीलरशिप नेटवर्क लाइव्ह उपलब्ध असेल. ही सुविधा ८ शहरात उपलब्ध केली जाणार आहे. यात मुंबई, पुणे, दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांचा समावेश आहे.

ग्राहकांना त्यांची मुदत संपेपर्यंत त्यांच्या पसंतीच्या नवीन मॉडेलमध्ये परत जाण्याचा, खरेदी करण्याचा किंवा अपग्रेड करण्याचा पर्याय निवडता येईल. ग्राहक क्विकलीज प्लॅटफॉर्मद्वारे त्यांच्या पसंतीचे वाहन घेऊन जाणे निवडू शकतात. ज्या कालावधीसाठी वाहन भाड्याने घेतले जाईल त्या कालावधीत ग्राहकाला वाहन बदलणे, दुसरे निवडणे, परत करणे किंवा नवीन मॉडेलमध्ये अपग्रेड करण्याचा पर्याय असेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, QuickLease प्लॅटफॉर्मद्वारे सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकाला २४ महिने ते ६० महिन्यांच्या कालावधीची निवड करता येईल. तसेच १० हजार किमी वार्षिक किमी पर्याय निवडण्याची सुविधा असेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही सुविधा वापरण्यासाठी किती पैसे खर्च होणार आहेत? तर वाहनांचे मासिक भाडे दरमहा २१ हजार रुपयांपासून सुरू होईल. कोणत्याही अतिरिक्त डाउन पेमेंटशिवाय विमा, देखभालीचा यात समावेश आहे.

एम अँड एम लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विजेय नाकरा यांनी सांगितले की, “आम्ही आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन ‘पे पर यूज’ मॉडेल आणले आहे, ज्यामुळे ग्राहकांना खूप फायदा होणार आहे. आमच्या विक्री चॅनेलद्वारे ग्राहकांना भाडे पर्याय प्रदान केल्याने ग्राहकांना सुविधा मिळेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *