Gold-Silver Price Today ; आज पुन्हा महागले सोने-चांदी, जाणून घ्या आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ फेब्रुवारी । जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे सोने-चांदीची घोडदौड कायम आहे. आज गुरुवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव २७० रुपयांनी वाढला. सोन्याने पुन्हा ५० हजारांच्या दिशेने कूच सुरु केली. चांदी ६३००० रुपयांच्या पातळीवर असून त्यावर मात्र विक्रीचा दबाव आहे. (Gold-Silver Price Today)

सध्या एमसीएक्सवर १० ग्रॅम सोन्याचा भाव ४९७४६ रुपये इतका आहे. त्यात १४२ रुपयांची वाढ झाली. सोमवारीच्या सत्रात सोन्याचा भाव ५०३२५ रुपयांपर्यंत वाढला होता. जानेवारी २०२१ नंतर प्रथमच सोन्याचा भाव ५० हजार रुपयांवर गेला.आज चांदीच्या किमतीत मात्र घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव ६३२०७ रुपये इतका आहे. त्यात ९२ रुपयांची घसरण झाली. तत्पूर्वी चांदीचा भाव ६२९२५ रुपये इतका खाली आला होता.

सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव ५० हजारांवर गेला होता. मुंबईत शुद्ध सोन्याचा भाव ५०१५० रुपये इतका झाला होता.चांदीचा एक किलोचा भाव ६२१५७ रुपये इतका आहे. मात्र त्यानंतर सराफा बाजारात या मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण दिसून आली. इंडियन बुलियन ज्वेलर्स अँड असोसिएशननुसार बुधवारी सोन्याचा भाव ४९४५७ रुपये असून चांदीचा भाव ६३२३४ रुपये इतका होता.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५८०० रुपये इतका आहे. त्यात ४०० रुपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेटचा भाव ४९९७० रुपये इतका खाली आला आहे. त्यात ४३० रुपयांची घसरण झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *