किरीट सोमय्या निघाले कोर्लईला ; स्थानिक शिवसैनिक ‘स्वागता’ला तयार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १८ फेब्रुवारी । राज्यात मागच्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अलीबागच्या कोर्लई गावात रश्मी ठाकरेंचे १९ बंगल्यांसंदर्भात सोमय्यांनी केलेला आरोप काल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फेटाळून लावला. त्यानंतर सोमय्यांनी थेट आज कोर्लईत (korlai, Alibag) जाऊन बंगल्यांची पाहणी करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार आज ८ वाजता सोमय्या कोर्लईला निघणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यामुळे आजही मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. (kirit Somaiya Visits Korlai)

अलीबागच्या कोर्लई गावात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर संपत्ती असून, त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. याबद्दल आपण तक्रार केली असून, तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी आज आपण कोर्लई गावात जाणार असल्याचं काल सोमय्यांनी सांगितलं. सकाळी आठ वाजता मुंबईतून अलिबागच्या दिशेने निघणार असून, कोर्लई ग्रामपंचायत, रेवदंडा पोलीस स्टेशन आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला सोमय्या भेट देणार असल्याचं समजतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *