Weather Alert : तापमानात होणार वाढणार ; पुढील ५ दिवस ‘या’ राज्यांना पावसाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १८ फेब्रुवारी । देशभरातील थंडीचा हंगाम जवळपास संपत आला आहे. पुढील काही आठवड्यांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे. देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस पडेल तर येत्या ५ दिवसांत पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पाऊस पडेल. तसेच झारखंड, ओडिशा आणि बिहारमध्ये २०-२१ फेब्रुवारीला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

स्कायमेट हवामानानुसार, मध्य आणि पूर्व भारत दोन्ही भागात पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशातून आजपासून पाऊस सुरू होणार असून तो १९ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर १९ आणि २१ फेब्रुवारीला छत्तीसगडच्या भागात पाऊस पडेल. यानंतर २० आणि २१ फेब्रुवारीला ओडिशा, बिहार, झारखंड आणि गंगा पश्चिम बंगालसह देशाच्या पूर्वेकडील भागात पाऊस होऊ शकतो.

हवामान खात्यानुसार, १९ आणि २० फेब्रुवारीला हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये जोरदार वारे वाहू शकतात. त्याचा वेग ताशी २५-३५ किलोमीटर असण्याची शक्यता आहे. इतकंच नाहीतर हिमाचल प्रदेश आणि काश्मीरच्या काही भागात पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान विभाग (IMD) ने म्हटले आहे की, दक्षिण द्वीपकल्प आणि अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तापमानाता होणार वाढ

दंव पडल्यानंतर येत्या पंधरवड्यापासून संपूर्ण देशात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने गुरुवारी व्यक्त केली. पुढील दोन आठवड्यांच्या अंदाजात, IMD ने म्हटले आहे की, आठवड्यातील बहुतेक दिवस देशातील उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची अपेक्षा आहे. २४ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान देशातील बहुतांश भागात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *