महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १९ फेब्रुवारी । देशाच्या राजधानीसह उत्तर भारतात आता थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. सुर्यप्रकाश पडत असल्याने नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळत आहे. दरम्यान, अनेक राज्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. तसेच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. पावसाचा अंदाज असणाऱ्या राज्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्याचा समावेश आहे. तर हिमाचलमध्ये पुन्हा एकदा पावसासह बर्फवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात थंडी कमी झाल्याने उन्हाचा चटका वाढत आहे. दरम्यान, विदर्भात आज ढगाळ हवामान राहणार असून काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील थंडीचा पारा कमी झाला आहे. राज्यात तापामानात वाढ होत असल्याने नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज विदर्भात हवामान ढगाळ राहणार असून, काही ठिकाणी हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राजधानी दिल्लीत सध्या लोक सूर्यप्रकाशाचा आनंद लुटताना दिसत आहेत. आजही दिल्लीत कमाल तापमान 25 आणि किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सकाळी थोडेसे धुके पडण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. परंतू, दिवसाच्या शेवटी हवामान स्वच्छ होईल. पुढील काही दिवस दिल्लीत असेच वातावरण राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.