महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १९ फेब्रुवारी । राज्यात सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह असताना शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच या पुतळ्याचे अनावरण करणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, औरंगाबादचे पालक मंत्री सुभाष देसाई, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, मंत्री अब्दुल सत्तार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात अशा अनेक नेत्यांची उपस्थिती होती.
आज आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
शिवजंयतीच्या पूर्वसंध्येल छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी क्रांतीचौक परिसरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दिव्यांच्या झगमगाटात परिसर उजळून निघाला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आश्वरुढ पुतळा देशातील सर्वाधिक उंच पुतळा आहे. चौथऱ्यासह या पुतळ्याची उंची 52 फूट एवढी आहे. या पुतळ्यामुळे औरंगाबादच्या वैभवात आणखीनच भर पडली आहे.